दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष यांनी अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यप विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे.
मुंबई, दि.२६ ऑक्टोबर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) या पक्षात अभिनेत्री पायल घोष यांनी आज जाहीर प्रवेश केला. अभिनेत्री पायल घोष यांची रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी चे राष्ट्रीय उपाध्यक्ष निवड करीत असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली. जुहू येथील इस्कॉनच्या गोविंदा हॉल मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतआठवले यांच्या उपस्थितीत अभिनेत्री पायल घोष तसेच अभिनेत्री सोनी कनिष्का, बिल्डर योगेश करकेरा, उद्योजक अंकुश चाफेकर, ऍड. नितीन सातपुते, आयशा सय्यद आदींनी यावेळी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला.दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष यांनी अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यप विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. त्याबाबत मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप यांची चौकशी केली आहे मात्र अद्याप त्यांना अटक केली नसल्याची नाराजी यावेळी अभिनेत्री पायल घोष यांनी व्यक्त केली. अनुराग कश्यप यांच्यावर आपण केलेले आरोप गंभीर असून त्याची चौकशी चालू आहे तो दोषी सिद्ध होईल. तो निर्दोष नाही. मात्र या प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत बॉलिवूड ने अनुराग कश्यप वर बहिष्कार टाकला पाहिजे असे आवाहन अभिनेत्री पायल घोष यांनी केले.