ठाकरे सारकरपूर्वी महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या फडणवीस सरकारच्या अनेक निर्णयांना महाराष्ट्र सरकारनं मातीमोल केलं आहे.
मुंबई, दि. ०१ नोव्हेंबर : अलिकडे महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. ठाकरे सारकरपूर्वी महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या फडणवीस सरकारच्या अनेक निर्णयांना महाराष्ट्र सरकारनं मातीमोल केलं आहे. अशातच आता ठाकरे सरकारनं आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेत फडणवीस सरकारला धक्का दिला आहे.फडणवीस सरकारने घर बांधणीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेतले होते. हेच अधिकार जिल्हा स्तरावर दिले होते. त्यामुळे नागरिकांना ग्रामीण भागात बांधकाम परवानगीसाठी अडचणी येत होत्या. फडणवीस सरकारच्या या निर्णयाला लोकप्रतिनिधींनीही विरोध केला होता. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द केला. आता पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे घर बांधणी परवानगीचे अधिकार देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.