ज्या महान लोकांनी २०११ पासून २०२० पर्यंत हे काम केलंय, त्यांचे फोटो या कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा,' असा टोला गडकरींनी अधिकाऱ्यांना लगावला.
नवी दिल्ली, दि. २६ ऑक्टोबर : कोणतंही काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम होतो. त्यात काम पूर्ण करणाऱ्यांचं कौतुक, अभिनंदन केलं जातं. पण तुमचं अभिनंदन करताना मला संकोच वाटतो केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. या उद्घाटन सोहळ्यावेळी नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. गडकरी म्हणाले,' अशा कार्यक्रमात प्रथा असते की, कोणतंही काम पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांचं अभिनंदन केलं जातं. पण मला संकोच वाटतोय की, तुमचं अभिनंदन कसं करू? कारण २००८मध्ये निश्चित झालं होत की, अशा पद्धतीची इमारत उभारण्यात येईल. २०११ मध्ये याची निविदा निघाली आणि हे दोनशे अडीचशे कोटींचं काम नऊ वर्षांनंतर आज पूर्ण झालं आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी लागलेल्या वेळेत तीन सरकारं आणि आठ अध्यक्ष राहिले. त्यानंतर आज ह काम पूर्ण झालं आहे. सध्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्षांचा याच्याशी काही संबंध नाहीये. पण ज्या महान लोकांनी २०११ पासून २०२० पर्यंत हे काम केलंय, त्यांचे फोटो या कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा,' असा टोला गडकरींनी अधिकाऱ्यांना लगावला.८० हजार १ लाख कोटी रूपयांच्या निधीतून तयार करण्यात येणारा दिल्ली-मुंबई महामार्ग तीन वर्षात पूर्ण करणार असल्याचं आपण अभिमानानं सांगतो आहोत. इतक्या मोठ्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या कामाला तीन साडेतीन वर्ष जर लागणार असतील आणि या दोनशे कोटीच्या कामासाठी आपण दहा वर्ष लावली, तर हे अभिनंदन करण्यासारखं नाही. पण मला याची लाज वाटतेय. असे गडकरी म्हणाले.