IMG-LOGO
महाराष्ट्र

रेल्वे मंत्रालय लोकलच्या प्रश्नावर 'कोमात' : रोहित पवार

Sunday, Nov 01
IMG

रोहित पवार यांनी लोकल रेल्वे सुरू करण्याबाबत थेट केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई, दि. ०१ नोव्हेंबर :  लोकलवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या वादात आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली आहे. देशात कोरोनाचा वेग मंदावल्यानंतर आता मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी केली जात आहे. मात्र रेल्वे प्रशासन लोकल रेल्वे सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक उशीर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारने केला आहे. रोहित पवार यांनी लोकल रेल्वे सुरू करण्याबाबत थेट केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर टीका केली आहे.श्रमिक रेल्वेबाबत राज्य सरकारने तपशील दिला नाही, असं ट्विट मध्यरात्री करण्याची तत्परता दाखवणारे रेल्वेमंत्री लोकल सुरु करण्याच्या पत्रावर चार दिवस उलटले तरी निर्णय घेत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. तर स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक अशा सामाजिक प्रश्नावर मात्र कोमात जातात.' असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे.

Share: