IMG-LOGO
राष्ट्रीय

कमलनाथ यांच्यावरील कारवाईला स्थगिती

Monday, Nov 02
IMG

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्टार कॅम्पेनर यादीतील नाव काढून टाकण्याचा जो आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

नवी दिल्ली, दि. ०२ नोव्हेंबर : माजी मंत्री व भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल बोलताना काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन गदारोळ उडाल्यानंतर भाजपच्या मागणीवरून निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचा स्टार प्रचारक हा दर्जा काढून घेतला होता. कमलनाथ यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्टार कॅम्पेनर यादीतील नाव काढून टाकण्याचा जो आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असा आदेश देण्याचा निवडणूक आयोगाला अधिकारच नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे कमलनाथ यांना दिलासा मिळाला आहे. 

Share: