सध्या राज्यात २४ लाख ५९ हजार ४३६ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर २४ हजार ६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
मुंबई, दि.२२ ऑक्टोबर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संख्येत झाली असून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्य ही १६ लाख ३१ हजार ८५६ एवढी झाली आहे. राज्यात दिवसभरात ७ हजार ५३९ नवीन रुग्णांचे निदान झालं. तर १९८ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर हा २.६४ टक्के एवढा झाला आहे. गुरुवारी 16 हजार 177 रुग्णांनी कोरोनावर मात केलीआहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४ लाख २ हजार ५५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख २५ हजार १९७ म्हणजे १९.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १ लाख ५० हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आत्तापर्यंत ४२ हजार ८३१ जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात २४ लाख ५९ हजार ४३६ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर २४ हजार ६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.