बाळासाहेबांच्या अंगणात तुळशीचेच झाड होते पण आता त्यांचा श्रावणबाळ जिथं दिनोच्या घरी जातो, तिथं गांजाची झाडे आहेत की कसली आहेत ते बघा असे नितेश राणे म्हणाले.
मुंबई, दि. २६ ऑक्टोबर : काल दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुख नव्हे तर बिघडलेल्या मुलाचा भडकलेला बाप बोलला अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. कालच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे आणि परीवारावर टीका केली होती. याला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. स्वत:च्या मुलावर संस्कार केले असते तर दुसऱ्याच्या मुलांवर बोलायची वेळ आली नसती, ड्रग प्रकरणाच्या यादीत त्याचे नाव आले नसते असेही राणे म्हणाले.बाळासाहेबांच्या अंगणात तुळशीचेच झाड होते पण आता त्यांचा श्रावणबाळ जिथं दिनोच्या घरी जातो, तिथं गांजाची झाडे आहेत की कसली आहेत ते बघा असे नितेश राणे म्हणाले. भाजप नेते नारायण राणे शिवसेना व महाराष्ट्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. अशातचशिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं. दसरा मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी राणेंचा उल्लेख बेडूक असा केला, तर नितेश राणे आणि निलेश राणे यांचा उल्लेख बेडकाची पिल्ल असा केला. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी ट्विटरवरून पलटवार केला आहे. मुंबई पुलिस वर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन दया.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!' असे ट्विट करत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.