IMG-LOGO
COVID-19

राज्यात दिवसभरात ५ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे

Thursday, Dec 10
IMG

सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७१ हजार ९१० इतकी आहे. याशिवाय आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४७ हजार ९७२ वर पोहचली आहे.

मुंबई, दि. १० डिसेंबर : आज राज्यात ५००८ रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १७,४७,१९९ कोराेनाबाधित रुग्ण बरे हाेवून घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे हाेण्याचे बरे ९३.५२ % एवढे झाले आहे.आज राज्यात ३,८२४ नवीन कोरोना रुग्णांची नाेंद झाली आहे. शिवाय सलग तिसऱ्या दिवशी राज्यात कोराेना रुग्ण बरे हाेवून घरी जाणाऱ्या संख्येत वाढ हाेत आहे. तर दिवसभरात ७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ६८ हजार १७२ वर पोहचली आहे. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७१ हजार ९१० इतकी आहे. याशिवाय आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४७ हजार ९७२ वर पोहचली आहे.

Share: