IMG-LOGO
महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी केली फोनवर चर्चा

Thursday, Jan 01
IMG

लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे. याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. आमच्या नेत्यांनी ऊर्जा मंत्र्यांची भेट सुद्धा घेतली.

मुंबई, दि. ३० ऑक्टोबर : राज्यपालांच्या  भेटीनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली.  राज्यातील असंख्य नागरीकांना वीजेची वाढीव बिले आली आहेत त्या संबंधात राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन दिले होते. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंतीही त्यांनी राज्यपालांना केली होती. त्यावेळी राज्यपालांनी या विषयावर पवारांशी बोला असा सल्ला राज ठाकरे यांना दिला होता.लॉकडाउनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे. याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. आमच्या नेत्यांनी ऊर्जा मंत्र्यांची भेट सुद्धा घेतली. पण, त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारने वीज ग्राहकांना गेल्या महिन्यांच्या वीजबिलातील वाढीव रक्कम परत करायला हवी, अशी पहिली मागणी राज ठाकरे यांनी केली. तसंच, 'दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावरही राज ठाकरेंनी लक्ष्य वेधलं. आज दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था एका लिटरमागे शेतकऱ्याला 17 ते 18 रुपये देतात आणि त्यावर भरघोस नफा कमवत असतात. कधी सुका दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभाल करणे महाग झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका लिटरमागे 27 ते 28 रुपये मिळावे', अशी मागणीही राज यांनी केली.

Share: