IMG-LOGO
महाराष्ट्र

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे थकित वेतन देण्यासाठी २ हजार कोटींचे कर्ज काढणार

Friday, Oct 30
IMG

गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत.

मुंबई, दि. ३० ऑक्टोबर : कोरोना महामारीमुळे तीन महिन्यांपासूनचे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार बाकी आहेत. यातच आता येणाऱ्या दिवाळी सणात एसटीची मागणी वाढते आणि त्यासाठी इंधन खर्चासह इतर गोष्टींसाठी पैसा लागतो. त्या अनुशंगाने एसटी महामंडळ 2 हजार कोटींचे कर्ज काढणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत. तसेच एसटी महामंडळाला इतर देणीही द्यायची आहेत. त्यासाठी हे कर्ज काढण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. एसटी महामंडळाने आधीच्या सरकारच्या काळात घेतलेलं १७०० कोटींचं कर्ज तब्बल ५ हजार कोटींवर जाऊन पोहोचलं होतं. अशातच कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे सगळं आर्थिकचक्र ठप्प झाली होती. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही राज्य सरकारला निधी द्यावा लागला होता. परंतु, सध्या राज्य सरकारलाही अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Share: