IMG-LOGO
नाशिक शहर

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका : शरद पवार

Wednesday, Oct 28
IMG

तीन दिवसांपासून कांदा लिलाव ठप्प आहेत. लिलाव बंद असल्यानं शेतकऱ्यांचं मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली.

नाशिक, दि. २८ ऑक्टोबर : कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत व्यापारी, शेतकरी यांच्या बैठका सुरु आहेत. आज कांदा प्रश्नावर बोलण्यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला जाणार असल्याची माहिती पवारांनी दिली. कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये. असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. व्यापाऱ्यांनी बाजार बंद करणं अयोग्य बोलून समस्या सोडवू व्यवहार सुरू करा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कांदा व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान कांदा निर्यातीबाबतचा निर्णय केंद्राच्या अख्त्यारीत येतो. यात राज्य सरकार काहीही करु शकत नाही. त्यामुळे कांदा प्रश्नावर बोलण्यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला जाणा असल्याची माहिती पवारांनी दिली.तीन दिवसांपासून कांदा लिलाव ठप्प आहेत. लिलाव बंद असल्यानं शेतकऱ्यांचं मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली.

Share: