IMG-LOGO
महाराष्ट्र

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Thursday, Nov 05
IMG

रिपब्लिक टीव्हीचे संपादक (Republic TV editor ) अर्णब गोस्वामी (Arnab goswami) यांना अलिबाग कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अलिबाग दि. ०५ नोव्हेंबर: रिपब्लिक टीव्हीचे संपादक (Republic TV editor ) अर्णब गोस्वामी (Arnab goswami) यांना अलिबाग कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला. गोस्वामी यांना अटक केल्यानंतर अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर गोस्वामी यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर कोर्टाने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितलं. नंतर पुन्हा संध्याकाळी त्यांना कोर्टात हजर करण्यात आली. जेष्ठ वकील आबाद फोंडा यांनी गोस्वामी यांच्यावतीने युक्तिवाद केला.

Share: