मुळचे महाराष्ट्रातील नागपूरचे असणारे हरिश साळवेंनी धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे
नवी दिल्ली, दि. २६ ऑक्टोबर : प्रसिद्ध वकील हरिश साळवे दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ३८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर साळवे वेगळे झाले होते. वयाच्या ६५ व्या वर्षी साळवे आता दुसरा विवाह करत आहेत.हरीश साळवे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मीनाक्षी असून त्यांना दोन मुलीही आहेत. हरीश साळवे २८ ऑक्टोबरला लंडनच्या चर्चमध्ये त्यांची मैत्रीण कॅरोलिन ब्रॉसार्डशी लग्न करणार आहेत. मुळचे महाराष्ट्रातील नागपूरचे असणारे हरिश साळवेंनी धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म स्विकारला आहे. मैत्रिण कॅरोलिन ब्रॉसर्ड यांच्याशी येत्या 28 ऑक्टोबरला ते विवाहबद्ध होणार आहेत. ५६ वर्षीय कॅरोलिन या व्यवसायाने एक कलाकार आहेत. त्यांना एक मुलगीही आहे. एका कला प्रदर्शनात हरीश साळवे यांची कॅरोलिनशी भेट झाली होती. त्यानंतर या दोघांमधील भेटी हळूहळू वाढल्या आणि नंतर घट्ट मैत्री झाली.