IMG-LOGO
महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हयातील इचलकरंजीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यानं स्वतःला घेतलं पेटवून

Monday, Oct 26
IMG

शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या संबंधीत घंटागाडीच्या चालकावर कारवाई करावी. या मागणीसाठी त्याने सोमवार २६ ऑक्टोबर रोजी नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

कोल्हापूर, दि. २६ ऑक्टोबर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरात आज (सोमवार) अंगावर शहारे आणणारी घटना घडली. इचलकरंजी शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्यानं स्वतःला पेटवून घेतलं. नगरपालिकेच्या आवारात  ही घटना घडली.  नरेश भोरे असं या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे. त्यांनी  नगरपालिकेत स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतलं. नरेश भोरे यांना तातडीनं सांगली येथील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या संबंधीत घंटागाडीच्या चालकावर कारवाई करावी. या मागणीसाठी त्याने सोमवार २६ ऑक्टोबर रोजी नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. अनेक वेळा, निवेदन आणि तक्रारी देऊनही त्याची दखल नगरपालिका प्रशासनाने घेतली नाही. म्हणून दोन दिवसांपूर्वी भोरे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, तरी देखील भोरे यांच्या इशाऱ्याकडेही इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. परिणामी भोरे यांनी सोमवारी नगरपालिकेच्या आवारातच स्वतः च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. सध्या त्यांच्यावर सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितले जात आहे.

Share: