IMG-LOGO
राष्ट्रीय

मराठा आरक्षण स्थिगितीवरील सुनावणी ४ आठवड्यांसाठी पुढे ढकलली

Tuesday, Oct 27
IMG

काही काळासाठी राज्य सरकारची बाजू मांडणार वकील मुकुल रोहतगी उपस्थित नसल्याने ही सुनावणी तहकूब करण्यात आली होती. मात्र, आता व्हीसीच्या माध्यमातून रोहतगी उपस्थित झाले होते.

नवी दिल्ली, दि. २७ ऑक्टोबर :  सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी ही सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती बाबतीची सुनावणी ४ आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. काही काळासाठी राज्य सरकारची बाजू मांडणार वकील मुकुल रोहतगी उपस्थित नसल्याने ही सुनावणी तहकूब करण्यात आली होती. मात्र, आता व्हीसीच्या माध्यमातून रोहतगी उपस्थित झाले होते. दरम्यान, राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबतीत गंभीर नसल्याची आरोप याचिका कर्त्यांकडून केला जात आहे.राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर असणारी नाराजी तसंच आरोप-प्रत्यारोप होत असताना होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या खंडपीठासमोरच सुनावणी होणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सकाळी ११ वाजता या प्रकरणी सुनावणी सुरू झाली. परंतु यावेळी सरकारी वकील मुकुल रोहतगी हे अनुपस्थित होते. परंतु त्यानंतर काही काळासाठी न्यायालयानं ही सुनावणी स्थगित केली. दरम्यान, याप्रकरणी आजच सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख नेते खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका केली. तसेच, मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू असताना वकील उपस्थित न राहणं हे चुकीचं असल्याची भूमिका विनायक मेटे यांनी मांडली.

Share: