यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ईद-ए-मिलाद’ सण साजरा करण्यात यावा.
मुंबई, दि. ३० ऑक्टोबर : ‘ईद-ए-मिलाद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. प्रेषित मोहम्मद पैगंबरांचा प्रेम, दया, शांती, त्यागाचा संदेश सर्वांनी आचरणात आणून मानवतेच्या कल्याणाचा विचार पुढे घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी केले.प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा ‘ईद-ए-मिलाद’ समाजात पैगंबरांचा एकता, समता, बंधुता, सौहार्दाच संदेश घेऊन जाईल. मानवतेच्या कल्याणासाठी सर्वांना प्रेरीत करील. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ईद-ए-मिलाद’ सण साजरा करताना आपण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांच सोशल डिस्टन्सिंगं स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.