राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून एकनाथ खडसे आपल्या वाहनाने जळगावकडे परत येत होते.
जळगाव, दि. ०१ नोव्हेंबर : राज्याचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात झाल्याचे वृत्त आहे. अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे. याबाबतची माहिती स्वतः खडसे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे.आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडी चा वेग कमी असल्याने आणि चालकाच्या प्रसंगावधाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही. असे ट्विट खडसे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून केले आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून एकनाथ खडसे आपल्या वाहनाने जळगावकडे परत येत होते.