IMG-LOGO
राष्ट्रीय

भारताने चीनला यावेळी जो धक्का दिला आहे त्यामुळे ड्रॅगन थंडावला : मोहन भागवत

Sunday, Oct 25
IMG

'हिंदुत्व हा असा शब्द आहे ज्याचा अर्थ पूजेशी जोडून संकुचित केले गेले आहे. संघाच्या भाषेत या संकुचित अर्थाने हा शब्द वापरला जात नाही.

नागपूर, दि. २५  ऑक्टोबर : चीनचा स्वभाव विस्तारवादी आहे. चीनने एकाच वेळी अनेक देशांसोबत शत्रुत्व स्वीकारले आहे. काही देशांनी चीनला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. चीनचा विस्तारवाद पाहता चीन पुढे काय करेल हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे भारताला चीनपेक्षा अधिक शक्तीशाली व्हावं लागेल, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते.या कोरोनाच्या संकटाच्या संदर्भात चीनची भूमिका संशयास्पद आहे असे म्हणणे सहजच शक्य आहे, पण भारताच्या सीमेवर ज्याप्रकारे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्या आर्थिक बळाच्या जोरावर करण्याच्या प्रयत्न चीनने केला आहे तो संपूर्ण जगासमोर स्पष्ट झाला आहे. भारताचे शासन, प्रशासन, सेना आणि जनतेनेही या आक्रमणाचा सामना खंबीरपणे करून आपला स्वाभिमान, दृढनिश्चय आणि वीरतेचा उज्ज्वल परिचय दिला आहे. यामुळे चीनला अनपेक्षित धक्का मिळाला आहे. या परिस्थितीत आपण सजग राहून दृढ राहावे लागेल.'डॉ. भागवत म्हणाले, 'हिंदुत्व हा असा शब्द आहे ज्याचा अर्थ पूजेशी जोडून संकुचित केले गेले आहे. संघाच्या भाषेत या संकुचित अर्थाने हा शब्द वापरला जात नाही. हा शब्द आपल्या देशाची ओळख, अध्यात्मावर आधारलेल्या त्याच्या परंपरेचे सातत्य आणि सर्व मूल्यसंपदेसह व्यक्त करणारा आहे. संघाची मान्यता आहे की हिंदुत्व हा शब्द भारतवर्षाला आपले मानणारा, त्याच्या संस्कृतीचे वैश्विक आणि सर्वकालिक मूल्ये आचरणात उतरवू पाहणारा आणि यशस्वीरित्या तसे करून दाखवणाऱ्या त्याची परंपरा मनात ठेवणाऱ्या सर्व १३० कोटी समाजावर लागू होतो.

Share: