IMG-LOGO
महाराष्ट्र

ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या पंकजा मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल

Monday, Oct 26
IMG

सावरगाव येथील भगवान गडाच्या पायथ्याशी पंकजा मुंडे दरवर्षी दसरा मेळावा घेत असतात. पण, यंदा कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा घेत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

बीड, दि. २६ ऑक्टोबर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ऑनलाईन दसरा मेळावा घेणं महागात पडण्याची शक्यता आहे. अमळनेर पोलिस स्टेशनमध्ये पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा यांच्यासह उभय नेत्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सावरगाव येथील भगवान गडाच्या पायथ्याशी पंकजा मुंडे दरवर्षी दसरा मेळावा घेत असतात. पण, यंदा कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे पंकजा मुंडे यांनी यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा घेत आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पंकजा मुंडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हिडीओ अपलोड करून सर्व समर्थक आणि भगवान भक्तांना महत्त्वाची सूचना केली होती. पंकजा मुंडे यांच्यासह ४० ते ५० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव जाणकर, खासदार भागवत कराड यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. काल (२५ ऑक्टोबर) सावरगाव घाट येथील भगवानभक्ती गड येथे पंकजा मुंडे यांनी ऑनलाइन दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. कोरोना महासाथ असल्यामुळे मेळाव्यासाठी कोणीही हजर राहू नये, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यामुळे गावातील लोकांशिवाय बाहेरचे फारसे लोक या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. मात्र, पंकजा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणतंही सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Share: