प्रश्न खूप आहेत, पण त्याबाबत काही तरी निर्णय घेणं गरजेचं आहे, एक दोन दिवसात या विषयावर निर्णय घ्यावा, कोरोना संकट काळात अनेकांचे रोजगार गेले, पैसे नाहीत त्यात बिल कसे भरणार?
मुंबई, दि. २९ ऑक्टोबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली, या भेटीत वाढील वीज बिल आणि दूध दरवाढ या दोन मुद्द्यावर प्रामुख्याने राज ठाकरेंनी राज्यपालांशी चर्चा केली. यावेळी राज्यपालांनी शरद पवारांना भेटण्याचा सल्ला राज ठाकरेंना दिला. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, याबाबत गरज पडल्यास मुख्यमंत्री, शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले.प्रश्न खूप आहेत, पण त्याबाबत काही तरी निर्णय घेणं गरजेचं आहे, एक दोन दिवसात या विषयावर निर्णय घ्यावा, कोरोना संकट काळात अनेकांचे रोजगार गेले, पैसे नाहीत त्यात बिल कसे भरणार? एका छोट्या निर्णयासाठी एवढे दिवस लागणार याला काय अर्थ आहे. निर्णय एक दोन दिवसात घ्यावा अशी विनंती आहे. राज्यपाल देखील बोलतील, पण सरकार आणि राज्यपालांचे फार सख्य असल्याने विषय किती पुढे जातील कल्पना नाही. पण ते सरकारसमोर गोष्ट मांडतील, अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.