संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहन रामदास आठवलेंनी केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई, दि. २७ ऑक्टोबर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे.संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहन रामदास आठवलेंनी केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.सकाळी रामदास आठवलेंनी आपली कोरोना चाचणी केली होता. तेव्हा त्यानंतर अहवालात ते पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. काल अभिनेत्री पायल घोषने आरपीआयमध्ये पायल घोषने प्रवेश केला आहे. यावेळी रामदास आठवले अनेकांच्या संपर्कात आले. पायल घोष देखील आता क्वारंटाईन आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मुंबईतील रुग्णालयात तटकरे उपचार घेण्यासाठी दाखल झाले आहेत.