IMG-LOGO
राष्ट्रीय

खरेदीसाठी जाताना ‘व्होकल फॉर लोकल’चा संकल्प लक्षात ठेवा – पंतप्रधान मोदी

Sunday, Oct 25
IMG

जेव्हा आपण लोकलसाठी व्होकल होत आहोत तेव्हा जगही आपल्या लोकल उत्पादनांची चाहती होत आहे. असेच एक उदाहरण आहे खादीचे.

नवी दिल्ली, दि. २५ ऑक्टोबर : मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आजच्या दसऱ्याच्या सणाच्या शुभेच्छा देशवासियांना दिल्या. ते म्हणाले, 'हे संकटांवर मात करण्याचे पर्व आहे. जे युद्ध आपण लढत आहोत त्यातही जिंकणारच आहोत. याआधी दुर्गेच्या मंडपात मेळ्यासारखे वातावरण असायचे, पण यावेळी तसे नाही. यापुढेही ईद, शरद पौर्णिमा, दिवाळी, छठपूजा, भाऊबीज असे सण आहेत. कोरोनाच्या काळात आपल्याला यावेळीही मर्यादांचे पालन करावे लागेल.'रामलीलाच्या उत्सवाचे देखील मोठे आकर्षण होते. मात्र त्यावर देखील काहीना काही निर्बंध आले आहेत. पूर्वी नवरात्र काळात गुजरातच्या गरब्याचा आवाज सर्वत्र येत होता. मात्र यंदा मोठमोठाले आयोजन सर्व बंद आहेत. आता पुढे आणखी उत्सवं येणार आहेत. ईद, शरद पोर्णिमा, वाल्मिकी जयंती, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, गुरूनानक जयंती आदी उत्सव आहेत. मात्र, करोनाच्या या संकट काळात आपल्याला संयमानेच वागायचे आहे, मर्यादेतच राहायचे आहे. असेही त्यांनी सांगितले.स्थानिक उद्योगांचा मोदींनी केला उल्लेखमन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी पुलवामाच्या ऊखू पेन्सिलचा उल्लेख केला. पेन्सिलचे लाकूड हे पुलवामाची ओळख आहे. त्यांनी म्हटले की काश्मीर खोरे हे ९०% पेन्सिलचे लाकूड पुरवते. तसेच मध्य प्रदेशातील एक शिक्षिका आणि सिंगरौलीच्या रहिवासी उषा दुबे यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की त्यांनी शाळेतील ग्रंथालय मोबाईल ग्रंथालयात परिवर्तित केले आहे. त्या या ग्रंथालयासह वेगवेगळ्या गावी जाऊन मुलांना शिकवतात. तर चंडीगढमध्ये एक स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या संदीप कुमार यांनी एका छोट्या व्हॅनमध्ये ग्रंथालय तयार केले असून गरीब मुलांना ही पुस्तके मोफत दिली जातात. व्होकल फॉर लोकलचा दिला नारामोदी म्हणाले, 'जेव्हा आपण लोकलसाठी व्होकल होत आहोत तेव्हा जगही आपल्या लोकल उत्पादनांची चाहती होत आहे. असेच एक उदाहरण आहे खादीचे. हे शरीरासाठी चांगले असलेले कापड जगातील अनेक ठिकाणी बनवले जात आहे. याशिवाय अनेक गावांमध्ये स्थानिक ग्रामस्थ खादी तयार करण्याचे काम करत आहेत. इतकेच नव्हे तर इथली खादी ओहाका खादी म्हणून प्रसिद्ध झाली आहे.' तसेच त्यांनी या सणासुदीच्या दिवसात एक दिवा आपल्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठीही लावण्याचे आवाहन केले. 

Share: