विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी आज महाविकास आघाडी सरकार मधील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे बंद पाकिटात सुपूर्द केली आहेत.
मुंबई, दि. ०६ नोव्हेंबर : विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी आज महाविकास आघाडी सरकार मधील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे बंद पाकिटात सुपूर्द केली आहेत.राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर आज अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. आज संध्याकाळी 6 च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली.12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?शिवसेना1) उर्मिला मातोंडकर – कला2) नितीन बानगुडे पाटील-3) विजय करंजकर –4) चंद्रकांत रघुवंशी –काँग्रेस1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा4) अनिरुद्ध वणगे – कलाराष्ट्रवादी काँग्रेस1) एकनाथ खडसे2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा3) यशपाल भिंगे – साहित्य4) आनंद शिंदे – कला