IMG-LOGO
नाशिक शहर

माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे निधन ; शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

Saturday, Oct 24
IMG

वनांचा विस्तार आणि संरक्षणासाठीही त्यांनी मोठे काम केले होते. त्यामुळे कुसुमाग्रजांनी त्यांना वनाधिपती ही उपाधी दिली होती.

नाशिक, दि. २४ ऑक्टोबर :  जेष्ठ नेते, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी (दि २३) रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.२४) सकाळी शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.विनायकदादा पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्ती मानले जात होते. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात काम करताना उद्योग, सांस्कृतिक, क्रीडा व युवक कल्याण अशी खाती सांभाळली होती. त्यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात भरीव योगदान दिले आहे.  शनिवारी सकाळी नाशिक अमरधाममध्ये दादांचे नातू हर्ष गरुड यांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवाला अग्नीडाग देण्यात आला. यावेळी पोलीसांच्या तुकडीने तीन फैरी आकाशात झाडून दादांना अखेरची मानवंदना दिलीवनांचा विस्तार आणि संरक्षणासाठीही त्यांनी मोठे काम केले होते. त्यामुळे कुसुमाग्रजांनी त्यांना वनाधिपती ही उपाधी दिली होती. त्यांच्या मागे दोन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्‍त केले आहे.

Share: