एकनाथ खडसे, जयसिंग गायकवाड यांच्यासारखे भाजपचे दिग्गज नेते आमच्याकडे आले,' असं म्हणत अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.
नांदेड, दि. २७ नोव्हेंबर : महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात सध्या भाजपचे नेते तोंडाला येईल ते काहीही बोलतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे तर बावचळल्यासारखे बोलत असल्याची खोचक टीका अजित पवार यांनी केली.अजित पवार म्हणाले, 'आमच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या असूनही आम्ही एकत्र आलो. सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका सांगितली आहे. वर्षपूर्ती निमित्ताने सरकारची वर्षभरातील कामं लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यक्रम करायचे आहेत. या निवडणुकीत अधिकाधिक मतदान करुन घेण्यासाठी मेहनतीनं काम करा. दिवस कमी राहिलेत, त्यामुळे पाचही जागी आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत. आपण पक्षातील कार्यकर्ते, नेते जो निर्णय घेतील त्यानुसार आपण काम करायचं आहे.' कार्यकर्ते कुठे जाऊ नये म्हणून भाजप आपल्या कार्यकर्त्यांना गाजर दाखवण्याचं काम करत आहे. तरीही एकनाथ खडसे, जयसिंग गायकवाड यांच्यासारखे भाजपचे दिग्गज नेते आमच्याकडे आले,' असं म्हणत अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.