IMG-LOGO
राष्ट्रीय

अलकायदाचं नेटवर्क NIAने केले उद्धवस्त, नऊ जणांच्या आवळल्या मुस्क्या

Saturday, Sep 19
IMG

राष्ट्रीय तपास संस्था(NIA) ने पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छापेमारी करत अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. या छापेमारीदरम्यान तपास यंत्रणेने 9 जणांना अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थाने ही छापेमारी केरळच्या अर्नाकुलम आणि पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबादमध्ये केली होती.

दिल्ली, दि. १९ सप्टेंबर : राष्ट्रीय तपास संस्था(NIA) ने पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छापेमारी करत अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. या छापेमारीदरम्यान तपास यंत्रणेने 9 जणांना अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थाने ही छापेमारी केरळच्या अर्नाकुलम आणि पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबादमध्ये केली होती.अटक केलेल्यांकडून तपास यंत्रणांना जिहादी कागदपत्रे, धारदार शस्त्रे, देश बनावटीचे कट्टे, उपलब्ध साधनांनी बनविलेले चिलखत, घरातल्या घरात स्फोटके बनवण्याचे मार्गदर्शन करणारी कागदपत्रे सापडली आहे. हे दहशतवादी काश्मीरमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये होते. पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांनी त्यांना शस्त्रास्त्रे पुरविण्याचे आश्वासन दिले होते अशी माहितीही पुढे आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व जण हे अल कायदाच्या हँडलरच्या संपर्कात होते. त्यांना पाकिस्तानातूनही मदत केली जात होती. या नऊ जणांनी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये आपलं नेटवर्क उभारलं होतं आणि बॉम्ब स्फोटासाठी सामानाची जुळवाजुळवही केली होती असंही उघड झालं आहे. 

Share: