जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत अनुष्काने विराटसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.
मुंबई, दि. २७ ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच आई होणार आहे. क्रिकेटपटू आणि अनुष्काचा पती विराट कोहलीने हे गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विराट आणि अनुष्काने इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. विराटप्रमाणेच अनुष्कानेदेखील इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी दिली. यात ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत अनुष्काने विराटसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. अनुष्काची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडू लागला आहे. दोघांच्याही या पोस्टला अवघ्या काही मिनिटांमध्ये हजारो लाईक्स मिळाले आहेत. फेसबुकवर पोस्ट केलेल्या फोटोत अनुष्का बेबी बंप दाखवताना दिसत आहे. डिसेंबर २०१७ मध्ये विराट आणि अनुष्का विवाहबद्ध झाले.