पंकजा यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसंदर्भात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकार्यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला.
बीड, दि. १९ मार्च : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर भाजपने बहिष्कार टाकला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली. उद्या म्हणजेच 20 मार्च रोजी ही निवडणूक होत आहे; मात्र ही निवडणूक नव्याने घेण्याची मागणी पंकजा यांनी केली आहे. निवडणूक लढवूनही फोरम पूर्ण होत नसल्याने बहिष्कार टाकण्याचा निर्णय पंकजा यांनी घेतला. दरम्यान, पंकजा यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसंदर्भात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकार्यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला. औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला नाही हे दुर्दैव आहे, असे त्या म्हणाल्या होत्या. हे सर्व म्हणजे सत्ताधार्यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून, या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पंकजा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना एका निवेदनाद्वारे केली.दरम्यान, महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे सहा उमेदवार बीड जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व संचालक उमेदवारांची काल बैठक घेतली. महाविकास आघाडीमार्फत शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढत असलेल्या उमेदवारांचा परिचय आघाडीतील सर्व तालुक्यातील प्रमुखांशी करून देण्यात आला. बीडमधील राष्ट्रवादी भवन येथे ही बैठक पार पडली.