IMG-LOGO
महाराष्ट्र

एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास

Friday, Aug 28
IMG

विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.

मुंबई, दि.२८ ऑगस्ट : 'एका 'बबड्याच्या' हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास झाला' अशा शब्दात माजी शालेय शिक्षण मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.'पदवीच्या अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनस्थितीशी खेळ करणाऱ्या राज्य सरकारने आता माफी मागण्याची वेळ आली आहे!' अशी मागणीही भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे.

Share: