सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
मुंबई, दि. २३. ऑगस्ट : सोयाबीनची शेती करणाऱ्यांना बोगस बियाणांचा मोठा फटका बसला आहे. यावरून राज्यातील कृषी खातं झोपलंय का?, असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडूंनी उपस्थित केला आहे.पंचनामे करण्याचं काम सुरू आहे. तहसीलदार, तालुका कृषी जिल्हाधिकारीदेखील सोबत आहेत. शेतीची सार्वत्रिक तपासणी करण्यात येईल. बियाणामुळे रोग पडला की वातावरणात काही रोग आहे, हे तपासलं जाईल. पंचनामे होतील. ज्यांनी विमा काढलाय, त्यांना विम्याचे पैसे मिळतील. बाकीच्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाईल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून त्वरित नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिलेत.दरवर्षी अशीच स्थिती आहे. 50 वर्षांत परिस्थिती जराही बदललेली नाही. बियाणं चांगलं मिळालं, असं एक वर्षही जात नाही. या प्रकरणात जो आरोपी आहे, कंपनीचा मालक आहे, त्याला धरून चोपलं पाहिजे. त्याच्याशिवाय यात सुधारणा होणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय.