मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने कहर केला असून बळीराजावर आता बास रे वरुणराजा. अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
मुंबई, दि. १६ ऑक्टोबर : 'मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो. पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल 'online' बघता येणार नाही. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल, अशी फेसबुक पोस्ट करत बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने कहर केला असून बळीराजावर आता बास रे वरुणराजा. अशी म्हणण्याची वेळ आली आहे. शेतात कापणीला आलेली उभी पीके पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा व त्यातून निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे.