आरसीबीच्या विजयाचा नायक फिरकीपटू युजवेंद्र चहल होता. त्याने 18 धावा देऊन 3 बळी घेतले. त्याने फॉर्मात असलेल्या सनरायझर्स हैद्राबादच्या जॉनी बेयरस्टो आणि मनीष पांडे यांना बाद केले.
मुंबई, दि. २२ सप्टेंबर : आयपीएलच्या 13व्या हंगामातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) सनरायझर्स हैद्राबादला 10 धावांनी पराभूत केले. आरसीबीने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 19.4 षटकांत 153 धावांवर बाद झाला. लीगमधील एका संघासाठी 50 सामने जिंकणारा विराट कोहली चौथा कर्णधार ठरला. त्याच्या आधी, एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्ज, गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्स आणि रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून 50 हून अधिक सामने जिंकले आहेत. धोनी सीएसकेसाठी 100 सामने जिंकणारा एकमेव कर्णधार आहे.आरसीबीच्या विजयाचा नायक फिरकीपटू युजवेंद्र चहल होता. त्याने 18 धावा देऊन 3 बळी घेतले. त्याने फॉर्मात असलेल्या सनरायझर्स हैद्राबादच्या जॉनी बेयरस्टो आणि मनीष पांडे यांना बाद केले. दुसर्या विकेटसाठी दोघांची 71 धावांची भागीदारी होती, जी चहलने मोडली. हे देखील सामन्याचे टर्निंग पॉईंट होते. खाते न उघडता चहलने विजय शंकरला क्लीन बोल्ड केले. त्यामुळे चहलला सामनावीर म्हणून निवडले गेले.