IMG-LOGO
राष्ट्रीय

बिहार काँग्रेससमध्ये मोठी फूट?

Wednesday, Jan 06
IMG

काँग्रेसच्या 19 आमदारांपैकी 11 आमदार असे आहेत, ज्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली असली, तरी ते काँग्रेसचे नाहीत. या लोकांनी पैसे देऊन तिकीट घेतले आणि आमदार झाले.

11 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीतपाटणा, दि. ६ जानेवारी  :  नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्या पराभवातून काँग्रेस अजूनही सावरलेली नाही. आत्मचिंतनाच्या बैठका अजूनही सुरू आहेत. अशातच बिहारमध्ये काँग्रेसला आता मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. बिहारमधील काँग्रेसचे 11 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.  बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसने संघटनात्मक बदल केले. काँग्रेस आता सावरते आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच काँग्रेसचे 11 आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा आहेत. तशी माहितीच काँग्रेसच्या माजी आमदारांनी दिली. त्यामुळे बिहारमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे, असे म्हटले जाते. काँग्रेस पक्षाचे काही आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे माजी आमदार भरत सिंह यांनी केला आहे. त्यानंतर बिहारच्या राजकारणामध्ये भूकंप झाला आहे. 19 पैकी 11 आमदार काँग्रेसचा हात सोडणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.काँग्रेसचे राज्यसभा खासदार शक्तिसिंह गोहिल यांच्याकडे बिहारचे काँग्रेस प्रभारीपद होते; परंतु विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना केली. त्यांची विनंती मान्य करत पक्षनेतृत्वाने त्यांना बिहार प्रभारी पदावरून मुक्त केले. गोहिल यांच्या जागी माजी केंद्रीय मंत्री भक्त चरण दास यांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या खांदेपालटानंतर काँग्रेसचे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या 19 आमदारांपैकी 11 आमदार असे आहेत, ज्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकली असली, तरी ते काँग्रेसचे नाहीत. या लोकांनी पैसे देऊन तिकीट घेतले आणि आमदार झाले, असा गौप्यस्फोट भरत सिंह यांनी केला आहे. आमदार जाणार कुठे?राष्ट्रीय जनता दल आणि भाजप आपले संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेक नेते काँग्रेस आमदारांच्या संपर्कात आहेत, असा दावा भरत सिंह यांनी केला. दरम्यान, त्यांचा हा दावा काँग्रेस नेते फेटाळत आहेत. काँग्रेस पक्ष एकसंध आणि एकजूट असल्याचे काँग्रेसचे राज्यसभा खासदार अखिलेश सिंह यांनी म्हटले आहे. 

Share: