अयोध्येतील प्रस्तावित ठिकाणी मशीद उभारण्याचं काम २६ जानेवारीपासून सुरू करण्याची तयारी देखील केली जात आहे. अयोध्येच्या धन्नीपूर येथील भागात मशीद उभारली जाणार आहे.
नवी दिल्ली, दि. २० डिसेंबर: गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या बाबरी मशीद प्रकरणाचा तिढा आता सुटला आहे. अयोध्येत बाबरी मशीदीच्या ठिकाणी आता भव्य दिव्य राम मंदिर उभारलं जाणार आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये याचं भूमीपूजनही करण्यात आलं आहे. बाबरी प्रकरणात निकाल देताना, न्यायालयानं मुस्लिम समुदायालाही काही जमीन देवू केली होती. ती जमीन बाबरी मशीदीपासून काही अंतरावरच आहे. त्याठिकाणी उभारण्यात येणारी धन्नीपूर मशीद कशी असेल, याची अनेकांना उत्सुकता होता. आज नुकताच याचा आराखडा जाहिर झाला आहे.अयोध्येतील प्रस्तावित ठिकाणी मशीद उभारण्याचं काम २६ जानेवारीपासून सुरू करण्याची तयारी देखील केली जात आहे. अयोध्येच्या धन्नीपूर येथील भागात मशीद उभारली जाणार आहे. मशिदीचं डिझाइन हे अंडाकार स्वरुपाचं मॉर्डन पद्धतीनं बांधण्यात येणार असून यात पारंपारिक पद्धतीचा घुमट ठेवण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, या मशिदीला लागूनच एक भव्य हॉस्पीटलची निर्मिती केली जाणार आहे. हॉस्पीटल आणि संग्रहालयाचंही डिझाइन जारी करण्यात आलं आहे. मशिदीचा आकाखडा मंजुर करुन घेण्याची तयारी देखील सुरु झाली आहे. धन्नीपूर येथे उभारली जाणारी मस्जिद ही दोन मजली असणार आहे. येत्या दोन वर्षात या मशिदीच्या उभारणीचं काम पूर्ण होईल अशी शक्यता आहे. मशिदीसोबतच सुसज्ज हॉस्पीटल, संग्रहालय, ग्रंथालय आणि समुदाय स्वयंपाकघर देखील उभारलं जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा नेमका खर्च किती होईल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.