IMG-LOGO
महाराष्ट्र

बोठेने पैशांचे व्यवहार कोणामार्फत केले?

Sunday, Mar 21
IMG

रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ बोठे यांच्या घरातून शुक्रवारी अनेक वस्तू हस्तगत केल्या आहेत. यामध्ये असलेला आयपॅड हा सुद्धा आता तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहे.

पोलिस घेताहेत शोध, आयपॅडचीही तपासणी लॅबमध्ये होणारअहमदनगर दि. २१ मार्च  :  रेखा जरे हत्याकांड प्रकरणांमध्ये पोलिसांनी सहाजणांना पकडले असले तरी अजून कोणाचा यात समावेश आहे काय, याचीसुद्धा माहिती आता पोलिस पत्रकार बाळ बोठेकडून घेत आहेत. जरे यांचा खून सुपारी देऊन झाल्याने व त्यात पैशाचे व्यवहार झाल्यामुळे हे व्यवहार कोणी, कसे व कोणामार्फत केले, याचा तपास सुरू झाला आहे. दरम्यान, बोठे याच्या आय-फोन व हस्ताक्षरापाठोपाठ आता त्याला आयपॅडही फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याच्या पोलिस कोठडीत 23पर्यंत वाढ करण्याचा आदेश पारनेर न्यायालयाने दिल्याने आता पोलिसांनी त्याची पुन्हा चौकशी सुरू केली आहे. त्याच्याकडील बँक खाते तसेच त्याने याअगोदर जी माहिती दिली आहे, त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे थेट पैशाचे व्यवहार कशा पद्धतीने झाले याचाही उलगडा आता लवकरच होणार आहे. रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ बोठे यांच्या घरातून शुक्रवारी अनेक वस्तू हस्तगत केल्या आहेत. यामध्ये असलेला आयपॅड हा सुद्धा आता तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहे. तर दुसरीकडे या घटनेसाठी पैशाचा व्यवहार कशा पद्धतीने झाला, याचासुद्धा तपास पूर्णत्वाकडे गेलेला आहे. त्यातच आता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार्‍या आयफोन, हस्ताक्षर व आयपॅड या तिन्ही वस्तूंचा उलगडा झाल्यानंतर अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार आहेत.आरोपी बोठे याला तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या घटनेनंतर आता पोलिसांनी त्याच्याकडून आयपॅड हस्तगत केलेला आहे तसेच अन्य काही वस्तू हस्तगत केल्या आहेत. बोठे याच्याकडील मोबाईल फोन हस्तगत केल्यानंतर ते आता सोमवारी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला जाणार आहे. त्याच्या आयफोनचा नगर येथे लॉक उघडण्याचा प्रयत्न झाला. मात्र ते लॉक उघडले गेले नाही. त्यामुळे आता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार आहे. त्यातच दुसरीकडे जरे हत्याकांड प्रकरणांमध्ये अजून कोणाचा समावेश आहे, याचीसुद्धा माहिती आता घेतली जात आहे. त्यातच पैशाचे व्यवहार झाल्यामुळे हे व्यवहार कोणी, कसे व कोणामार्फत केले, याचा तपास सुरू झाला आहे. गेल्या तीन महिन्यापासून पोलिसांनी रेखा जरे यांच्या हत्याकांडाबद्दल जे जे काही पुरावे आहेत, ते गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 40 हून अधिक जणांचे जबाब घेतल्यामुळे पोलिसांच्या हाती अनेक माहिती आली आहे. पण फॉरेन्सिक लॅबकडे मोबाईल, हस्ताक्षर तसेच आयपॅड पाठवल्यानंतर यातून अनेक गोष्टी उघडकीस येणार आहेत.

Share: