चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे अवताडे यांनी विजयाच्या दिशेने पहिल्या फेरीपासून वाटचाल केली होती.
पंढरपूर, दि. २ मे : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. या निकालाचे चित्र स्पष्ट झाले असून पंढरपूर, मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे अवताडे यांनी विजयाच्या दिशेने पहिल्या फेरीपासून वाटचाल केलीहोती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी समाधान अवताडे यांच्या घराबाहेर जल्लोष करण्यास करण्यास सुरुवात केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात पोटनिवडणूक पार पडली. ही पोट निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. समाधान अवताडे यांना 35 व्या फेरीअखेर 4549 मतांची आघाडी होती. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष करण्यास सुरुवात केली. मतमोजणीच्या एकूण 36 फेऱ्या पार पडल्या. तर सुरुवातील पोस्टल मतमोजणी घेण्यात आली.