कृषी कायद्यांच्या विरोधात शेतक-यांनी 26 जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. त्या वेळी अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिस आमनेसामने आले. दिल्लीच्या काही भागांमध्ये हिंसाचार झाला.
शेतकरी संघटनांचा निर्णय; वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना पुरवणार अन्नपाणीनवी दिल्ली, दि. ४ फेब्रुवारी : केंद्र सरकरारच्या तीनही कृषी कायद्यांविरोधात भारतीय किसान युनियनने चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली आहे. सहा तारखेला शेतक-यांकडून चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. दिल्लीसोबतच दिल्लीच्याबाहेर चक्का तीन तासांसाठी चक्का जाम केला जाईल, अशी माहिती भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली. ’चक्का जाम आंदोलनाच्या वेळी वाहतूक कोंडीत अडकणार्यांना पाणी आणि जेवण देण्यात येईल. सरकार आमच्यासोबत कशा प्रकारचे वर्तन करते आहे, याची माहितीदेखील आम्ही वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना प्रवाशांना देऊ,’ असे टिकैत यांनी सांगितले. कृषी कायद्यांच्या विरोधात शेतक-यांनी 26 जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. त्या वेळी अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिस आमनेसामने आले. दिल्लीच्या काही भागांमध्ये हिंसाचार झाला. दिल्ली पोलिसांनी शेतक-यांना ताब्यात घेतले. त्यांची अद्याप सुटका झालेली नाही. त्यांची सुटका करण्याची मागणी टिकैत यांनी केली. शेतकरी आंदोलन करत असलेल्या भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, याकडेदेखील त्यांनी लक्ष वेधले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भारतीय किसान संघाने चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. ’दिल्लीच्या सीमावर्ती भागांत सुरू असलेले आंदोलन पूर्णपणे राजकीय झाले आहे. हे आंदोलन राजकीय अजेंड्याचा भाग आहे. कॅनडा, ब्रिटिशमधील राजकीय नेते, काही सेलिब्रिटी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे हे आंदोलन म्हणजे भारताविरोधात सुरू असलेला अजेंडा आहे. यामुळे देशाच्या शांततेला धोका निर्माण झाला आहे,’ असे भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय सचिव बद्री नारायण चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, संसदेचे आजचे कामकाज सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह देशभरातील अनेक खासदार दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डवर शेतक-यांच्या आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी पोहोचले; मात्र या सर्वांना दिल्ली पोलिसांनी सीमेवरच अडवून आंदोलनस्थळी जाण्यास मज्जाव केला.शेतकरी आंदोलनाला भेट देण्यासाठी निघालेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, केरळमधील अनेक खासदार होते. विविध राज्यातील दहा पक्षांचे खासदार यानिमित्ताने एकत्र आले होते. या सर्वांना पोलिसांनी तीन किलोमीटर आधीच रोखण्यात आले. पोलिसांची ही कृती म्हणजे देशाच्या लोकशाहीवर होत असलेला मोठा हल्ला असून त्यावर कोणी बोलत नाही, असे पंजाबमधील एका खासदाराने सांगितले. या वेळी सुळे म्हणाल्या, की शेतकर्यांच्या पाठिंब्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही येथे गडबड करायला आलो, की काय अशा पद्धतीने प्रचंड मोठा पोलिस फौजफाटा आणि बॅरिकेटस् लावून आम्हाला रोखण्यात आले. अन्नदाता सुखी भव असे संस्कार आपल्यावर झालेले आहेत; मात्र शेतक-यांशी सरकार ज्या पद्धतीने वागते आहे, ते अतिशय दुर्देवी आहे. आम्ही संसदेत यावर वेगळी चर्चा करण्याची मागणी केली; परंतु सरकार त्याला तयार नाही. आम्ही शेतकर्यांशी चर्चाच करू नये, असे पोलिसांचे म्हणणे आहेचीन, पाकिस्तान सीमेवरही नाहीत एवढे निर्बंधपाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवरही नसेल, इतकी कठोर बंधने येथे घातली आहेत. हे सरकार असंवेदनशील आहे, सरकारमधील लोकांना शेतकरी आपला वाटत नाही. आम्हाला पुढे जाऊ दिले नाही. आता आम्ही लोकसभा अध्यक्षांकडे जाऊन इथली परिस्थिती समजावून सांगू, असे सुळे यांनी सांगितले.