IMG-LOGO
महाराष्ट्र

आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या- चंद्रकांत पाटील

Friday, Nov 27
IMG

उद्धव ठाकरेंचा अभ्यास नाही. त्यांना कामकाजाची माहिती नाही. मंत्रालय कुठे आहे, हेदेखील त्यांना माहिती नव्हतं. शरद पवार यांनी अचानकपणे उद्धव ठाकरेंच्या नावाचा नावाचा प्रस्ताव ठेवला.

मुंबई, दि. २७ नोव्हेंबर : सरकार गोंधळलेलं आणि दिशा नसलेलं सरकार आहे. वर्षभर तुम्ही कसं काम करता, ते जनतेने पाहिलं. आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. “उद्धव ठाकरेंचा अभ्यास नाही. त्यांना कामकाजाची माहिती नाही. मंत्रालय कुठे आहे, हेदेखील त्यांना माहिती नव्हतं. शरद पवार यांनी अचानकपणे उद्धव ठाकरेंच्या नावाचा नावाचा प्रस्ताव ठेवला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याआधी आमदार, नगरसेवक होते. मीदेखील रात्री तीन वाजेपर्यंत अभ्यास करायचो. नरेंद्र मोदीही अचानक मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी अभ्यास केला. उद्दव ठाकरेंना विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली नाहीत,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांची गरिमा राखणारी ही भाषा नाही, सामनाच्या मुलाखतीतून फक्त धमक्या दिल्या. मुख्यमंत्र्यांची भाषा ही संयमी असावी. मुख्यमंत्री आश्वासक वाटावा, भीतीदायक नाही. त्यांनी सहनशीलता वाढवली पाहिजे, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.

Share: