IMG-LOGO
मनोरंजन

शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचं निधन

Monday, Aug 17
IMG

पंडित जसराज यांनी वयाच्या १४ व्या वर्षी गायक म्हणून प्रशिक्षण सुरू केले.

वॉशिंग्टन, दि. १७ ऑगस्ट : भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जसराज यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज यांच्या जाण्यामुळे संपूर्ण संगीत आणि कला विश्वावर शोककळा पसरली आहे.पंडित जसराज यांनी वयाच्या १४ व्या वर्षी गायक म्हणून प्रशिक्षण सुरू केले. वयाच्या २२व्या वर्षी गायक म्हणून त्यांनी पहिली रंगलेली मैफिल सादर केली. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.शास्त्रीय गायनाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या नावाने एक ग्रहही अंतराळात आहे. आंतरराष्ट्रीय खगोल संघाने मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांच्या मध्ये असलेल्या एका ग्रहाचे नाव पंडित जसराज असे ठेवले आहे. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय कलावंत ठरले.

Share: