मुंबई विद्यापीठाने पोलिसांकडे तक्रार केली असून अनेक तज्ञ मंडळी याचा शोध घेऊन मुळापर्यंत जाणार आहेत अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली़.
मुंबई, दि. ०७ ऑक्टोबर : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये काल जो गोंधळ उडाला तो सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे झाला होता. बहिस्थ परिक्षार्थींची संख्या ९ हजार असताना अडीच लाख जणांनी त्यावर लॉग इन केल्याचे दिसत होते. हा सायबर हल्ला असून यंत्रणा कोलमडून टाकण्याचा प्रयत्न होता़.यासंदर्भात मुंबई विद्यापीठाने पोलिसांकडे तक्रार केली असून अनेक तज्ञ मंडळी याचा शोध घेऊन मुळापर्यंत जाणार आहेत अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली़.