IMG-LOGO
नाशिक शहर

विभागीय महिला लोकशाही दिन 8 फेब्रुवारी रोजी

Saturday, Feb 06
IMG

मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून विभागीय स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

नाशिक दि. ६ फेब्रुवारी : विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड येथे सोमवारी ,8 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे नाशिक विभाग नाशिक महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उप आयुक्त श्रीमती सुरेखा पाटील यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यासपिठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा तसेच महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून विभागीय स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्या काही समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केले असतील व त्यांना समस्येचे उत्तर मिळाले नसेल त्यांनी जिल्हा स्तरीय महिला लोकशाही दिनाचे टोकन नंबरसह आपले अर्ज विभागीय महिला लोकशाही दिनात सादर करावेत, असे आवाहन नाशिक विभाग नाशिक महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय उप आयुक्त श्रीमती सुरेखा पाटील यांनी केले आहे.

Share: