याबाबत कोणीच सोयीस्कर राजकीय भूमिका घेऊ नये. सगळ्याच नेत्यांना मदत कशी मिळते हे माहिती आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको.
बारामती, दि. १९ ऑक्टोबर : शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करणारचं आहे. परंतु केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आधी राज्याच्या सरकारने मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. टोलवाटोलवी नको आहे, राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्टपणे सांगावे अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.याबाबत कोणीच सोयीस्कर राजकीय भूमिका घेऊ नये. सगळ्याच नेत्यांना मदत कशी मिळते हे माहिती आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करेलच. पण पहिली जबाबदारी राज्य सरकारची असल्यामुळे राज्याने तातडीने मदत करावी. केंद्राच्या मदतीची वाट राज्य सरकारने बघत राहू नये. ते स्वत: काय करणार ते त्यांनी सांगावे, असे फडणवीस म्हणाले.