गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि मंत्री धनंजय मुंडे यांनीही गोपीनाथ मुंडे यांना आपल्या खास शैलीत अभिवादन केलं आहे.
मुंबई, दि. १२ डिसेंबर : भाजपाचे दिवंगत नेते यांची आज, १२ डिसेंबर रोजी जयंती आहे. राजकीय क्षेत्रातून तसेच समाज माध्यामांतून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि मंत्री धनंजय मुंडे यांनीही गोपीनाथ मुंडे यांना आपल्या खास शैलीत अभिवादन केलं आहे."अप्पा...खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम मनात असते.त्याच प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा,त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय". स्व.अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.