IMG-LOGO
मुंबई

विलगीकरण केल्याने परदेशातून आलेले नाराज

Tuesday, Dec 22
IMG

प्रवाशांचे विलगीकरण करण्यासाठी 50 पेक्षा जास्त बसेसचा वापर करण्यात आला. सर्व प्रवाशांना महापालिकेने ठरविलेल्या हॉटेलमध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले.

मुंबई, दि. २२ डिसेंबर  : युरोप आणि मध्य पूर्व देशांमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने सोमवारी मार्गदर्शकतत्व जारी केले आहेत. त्यानुसार युरोपहून येणा-या सर्व अंतरराष्ट्रीय विमान सेवांना 23 तारखेपासून महाराष्ट्राच्या सीमेत दाखल होण्यावर प्रतिबंध आहे. लंडनहून आलेल्या दोन विमानांच्या प्रवाशांना विलगीकरण करण्याच्या आदेशाने प्रवाशांसह त्यांचे कुटुंबीय नाराज झाले. सरकारने घेतलेल्या निर्णयादरम्यान लंडनहून मुंबईसाठी दोन विमानांनी उड्डाण घेतले होते. मुंबईत पोहचलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षित विलगीकरणात ठेवण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेने पार पाडली. वेळ न वाया घालवता मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये आली. मुंबईत पोहचलेले प्रवाशी या नव्या नियमाबाबत अनभिज्ञ होते. त्यांना या गोष्टीची स्पष्ट कल्पना नव्हती, की, त्यांना विलगीकरणात ठेवले जाईल; परंतु रात्री उशिरा युरोपहून मुंबईत पोहचलेल्या प्रवशांची सुरक्षा म्हणून मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता.प्रवाशांचे विलगीकरण करण्यासाठी 50 पेक्षा जास्त बसेसचा वापर करण्यात आला. सर्व प्रवाशांना महापालिकेने ठरविलेल्या हॉटेलमध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले. विमान मुंबईत उतरण्यापूर्वीच बेस्टच्या सर्व चालकांना पीपीई किट दिले आणि बसेस सॅनिटाइज केल्या. रात्री उशिरा लंडनहून दोन विमाने मुंबईत पोहचल्यानंतर सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये नेण्यात आले; परंतु या दरम्यान प्रवाशी आणि त्यांना घेण्यासाठी पोहचलेल्या कुटुंबीयांमध्ये या निर्णयाबाबत खूप संभ्रम होता. लंडनहून मुंबईत पोहचलेले प्रवाशी अनभिज्ञ होते, तर त्यांचे कुटुंबीय नाराज होते.

Share: