IMG-LOGO
महाराष्ट्र

ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांचं निधन

Tuesday, Sep 22
IMG

ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे हे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे अभ्यासक, अनुयायी होते.

नागपूर, दि.२२ सप्टेंबर : बौद्ध धर्माचे अभ्यासक, नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे यांचं मंगळवारी निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे हे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे अभ्यासक, अनुयायी होते. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवून त्यांनी सामाजिक न्यायाच्या चळवळीला दिशा देण्याचे काम केले. पाली भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास होता. सामाजिक चळवळींचे अभ्यासक, भाष्यकार म्हणून ते परिचित होते. साहित्यिक म्हणूनही त्यांनी वेगळा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक चळवळीचे मोठे नुकसान झाले असून थोर विचारवंताला आपण मुकलो आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Share: