IMG-LOGO
महाराष्ट्र

प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी

Thursday, Dec 10
IMG

ईडीला चौकशीसाठी पुन्हा बोलवायचंच असेल तर फक्त फोन केला तरी हजर राहीन, त्यासाठी समन्स देण्याची गरज नाही असं विधान करतानाच त्यांनी ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं आहे.

मुंबई, दि. १० डिसेंबर : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक दाखल झाले असून ईडी कार्यालयात चौकशीला प्रताप सरनाईक यांनी हजर राहावे यासाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार ईडी कार्यालयात ते हजर झाले असून चौकशीला सुरुवात झाली आहेत.सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण मिळाल्यानंतर सरनाईक पिता-पुत्र ईडी कार्यालयात हजर झाले होते. प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा विहंग सरनाईक यांची चौकशी होणार आहे. टॉप्स सिक्युरिटी घोटाळ्याबाबत 24 नोव्हेंबर रोजी ईडीने प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर धाडी टाकल्या होत्या. आज सरनाईक यांची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांनी बाहेर येताच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ईडीला चौकशीसाठी पुन्हा बोलवायचंच असेल तर फक्त फोन केला तरी हजर राहीन, त्यासाठी समन्स देण्याची गरज नाही असं विधान करतानाच त्यांनी ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं आहे.

Share: