IMG-LOGO
महाराष्ट्र

वारीच्या काळात पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी

Tuesday, Jun 22
IMG

स्थानिक पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्तावही सादर केला असून लवकरच संचारबंदीचे आदेश निघण्याची शक्यता आहे.

पंढरपूर, दि. २२ जून :  गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वारी मर्यादित स्वरुपात होत आहे. यंदाही मर्यादित स्वरुपात वारीला परवानगी दिली आहे. त्यातच आता आषाढी वारी दरम्यान पंढरपुरात संचारबंदी लागण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात स्थानिक पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्तावही सादर केला असून लवकरच संचारबंदीचे आदेश निघण्याची शक्यता आहे.

Share: