IMG-LOGO
राष्ट्रीय

निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा

Tuesday, Aug 18
IMG

लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सूपूर्द केला आहे.

नवी दिल्ली, दि. १८ ऑगस्ट  :  निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते निवडणूक पॅनलच्या दुसरे क्रमांकाचे आयुक्त होते. ते आपल्या पदाचा राजीनामा देऊन पुढील महिन्यात फिलिपिन्सची एशियन डेव्हलपमेंट बॅंकचे उपाध्यक्ष म्हणून रुजू होणार आहेत.लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सूपूर्द केला आहे. तसेच आपल्याला ३१ ऑगस्ट रोजी या पदावरून मुक्त करण्याची विनंती त्यांनी राष्ट्रपतींना केली आहे. जानेवारी २०१८ मध्ये लवासा यांनी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या इतिहासात आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे लवासा हे दुसरे आयुक्त ठरले आहेत.

Share: