गोपीनाथ मुंडेंनी मला एक राजकीय मंत्र दिला, संघर्ष करायला आम्ही जे शिकलो ते गोपीनाथरावांमुळेच शिकलो. गोपीनाथराव मला एकच गोष्ट सांगायचे.
मुंबई, दि. १२ डिसेंबर : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरुन गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं आहे.देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ क्लीप शेअर केली आहे. त्यात स्व. गोपीनाथजी मुंडे : हिंमत-आत्मविश्वास जागविणारे आणि आम्हाला संघर्षाचा मूलमंत्र देणारे नेते! गोपीनाथ मुंडेंनी मला एक राजकीय मंत्र दिला, संघर्ष करायला आम्ही जे शिकलो ते गोपीनाथरावांमुळेच शिकलो. गोपीनाथराव मला एकच गोष्ट सांगायचे. देवेंद्र. जीवनात मोठं व्हायचं असेल तर सत्तेशी समझोता करु नको, सत्तेशी संघर्ष कर. सत्तेशी समझोता करुन कोणालाही पुढे जाता येत नाही, मोठं होता येत नाही. पण, सत्तेशी संघर्ष केल्यानंतर आपणास जीवनात मोठं होता येतं. आज गोपीनाथराव प्रत्यक्ष रुपाने नसले तरी, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठिशी आहे. कितीही संकटं आली तरी, संकटावर मात करायला आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो आहोत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं आहे. आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान लोकनेते मा. गोपीनाथजी मुंडे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन !