एक जानेवारीला शेतक-यांनी दिल्ली आणि हरियाणावासियांना नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आंदोलनस्थळी निमंत्रित केले आहे.
शेतकरी आंदोलन; मोदींच्या मन की बातचा थाळीनादाने निषेधनवी दिल्ली, दि. २७ डिसेंबर : कृषी कायदे मागे घ्यावे, या मागणीसाठी दिल्ली-हरियाणाच्या सिंघू सीमेवरील शेतक-यांची निदर्शने सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या वेळी शेतकर्यांनी थाळीनाद केला. दिल्ली-हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर शेतकर्यांच्या निदर्शनामुळे दिल्ली-एनसीआरमधील लोकांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागते आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांत पुन्हा एकदा संवादाचा मार्ग मोकळा झाला असताना दुसरीकडे शेतक-यांनी तीस तारखेला ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. कृषी मंत्रालयाच्या सहसचिवांनी पाठविलेल्या चर्चेच्या प्रस्तावाला शेतकरी संघटनांनी सहमती दर्शविली. 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता चर्चा होणार असली, तरी शेतकरी नेत्यांनी चर्चेसाठी चार प्रमुख मागण्या केल्या आहेत आणि सरकारला एक मसुदा पाठविला आहे. त्याचवेळी आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 30 डिसेंबर रोजी शेतकरी सिंघू बॉर्डर ते टिकरी व शाहजहांपूरपर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढतील. एक जानेवारीला शेतक-यांनी दिल्ली आणि हरियाणावासियांना नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आंदोलनस्थळी निमंत्रित केले आहे. किसन आंदोलनात रविवारी नोएडाच्या सेक्टर 1- ए च्या चिल्ला बॉर्डर येथे भारतीय किसान युनियनच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत नवीन कृषी कायद्यांचा निषेध केला. जनता संचारबंदीच्या अगोदर शेतक-यांनी मोदी यांच्या आवाहनाला टाळ्या, थाळ्या वाजवून सरकारला पाठिंबा दर्शविला; आता पराती वाजवून निषेध केला. यूपी गेटवरील दिल्ली ते गाझियाबादपर्यंतची लेनही शेतकर्यांनी बंद केली. यूपीच्या गेटवर शेतकर्यांनी टाळ्या वाजवून ठिय्या आंदोलन केले. गाझीपूर सीमेवर कृषी कायद्यांचा निषेध करून शेतकर्यांनी नमाज अदा केली. कृषी कायद्याविरूद्ध टीकिंग बॉर्डरवर शेतकर्यांचा निषेध सुरू आहे. दिल्लीकडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गांच्या सर्व लेनवर शेतक-यांचा ताबा आहे. येथून वाहनचालक दिल्लीला जाऊ शकत नाहीत. परिसरातील अंतर्गत रस्त्यावर लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला; मात्र संध्याकाळी शेतकरी दोन्ही मार्गावरून माघार घेतल्यानंतर त्यानंतर वाहतूक सामान्य झाली. त्याअगोदर सहा तास वाहतूक ठप्प होती. एक्स्प्रेस वेवर निदर्शने पाहून युपी गेटवर बसलेल्या शेतकर्यांनी दिल्ली ते उत्तर प्रदेश सीमेपर्यंतचा रस्ताही रोखला.कुमारस्वामींकडून पंतप्रधांनाना पाठिंबाशेतक-यांच्या प्रश्नावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून दुसरा पक्ष बाहेर पडला असताना भाजपचा कर्नाटकमधील विरोधक असलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी मात्र कृषी कायद्याबद्दल पंतप्रधानांना पाठिंबा दिला आहे. अर्थात गेल्या आठवड्यातच कुमारस्वामी यांनी काँग्रेसवर टीका करून भाजपशी जवळीक वाढविली होती. शेतक-यांनी एकदा खुल्या विचाराने नवीन कृषी कायद्यांचा प्रयोग करू पाहा, असे कुमारस्वामी म्हणाले. शेतकरी आंदोलनाने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या प्रतिमेवर विपरित परिणाम होण्याचा इशारा देत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा तिढा सोडवण्याचे आवाहन केले.